सलाम हिमा

मोहसीन आतार, माण
Sunday, 21 July 2019

शंढ माध्यम गुंग अजूनही
चर्चा हारलेल्या क्रिकेटची
चंदेरी दुनियेतल्या सोनेरी
तैमुरच्या हाफचड्डीची

चर्चा झाली खूप काही
पळून गेलेल्या पोरीची
पुढारी बापाच्या नाकावर
टिच्चुन लग्न केल्याची

शंढ माध्यम गुंग अजूनही
चर्चा हारलेल्या क्रिकेटची
चंदेरी दुनियेतल्या सोनेरी
तैमुरच्या हाफचड्डीची

धावली ती त्वेषाने
खेचुन आणले स्वर्ण
मिडीया आमची झोपलेली
लेवुन चादर कुंभकर्ण

आसामच्या अश्रुसंगे
तिची आसवेही ओघळली
सलाम "हिमा "मनापासून
देशाची मान तू उंचवली

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News