सलमानचा "भारत" दुसऱ्याच दिवशी लीक; सिनेमाच्या कमाईवर परिणाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

ईदच्या मुहूर्तावर दबंग खान सलमान याचा "भारत" हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : ईदच्या मुहूर्तावर दबंग खान सलमान याचा "भारत" हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेक तितकी या चित्रपटाच्या लिंक व्हायरल होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनविणार असल्याच्या रांगेत असतानाच सलमान खान आणि निर्मात्यांना यामुळे मोठा धक्का मिळू शकतो. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, "भारत"ला हॅकिंगसाठी बदनाम असलेली वेबसाईट तामिळ रोकर्सने लीक केली आहे. सलमानचा हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करणात आले आहेत. हा सिनेमा तेव्हा 300 कोटी कमावेल जेव्हा तो सिनेमागृहांमध्ये बघितला जाईल, असं ‘भारत’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खान म्हणाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ७० देशात एकूण ५३०० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

तामिळ रॉकर्सने यापूर्वीही अनेक बडे सिनेमे ऑनलाईन लीक केले आहेत. या वेबसाईटविरोधात अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक काळापासून सिनेमा प्रदर्शित होताच तो लीक होऊन जातो. त्यामुळे सिनेमांच्या कमाईवर मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे सलमान खान आणि निर्मात्यांवर संकट येणार असल्याचं दिसत आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News