या चित्रपटात सलमान करणार 'आयटम साँग'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019

मात्र या वेळी मुन्नी नाही; तर मुन्ना बदनाम होणार आहे. सलमान या चित्रपटात आयटम साँग करणार आहे.

अभिनेता सलमान खानने बॉक्‍स ऑफिसवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. त्यातील ‘दबंग’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

याच चित्रपटातील अभिनेत्री मलायका अरोराचे ‘मुन्नि बदनाम’ हे गाणे तुफान गाजले होते.

या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना सलमानच्या ‘दबंग-३’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मात्र या वेळी मुन्नी नाही; तर मुन्ना बदनाम होणार आहे. सलमान या चित्रपटात आयटम साँग करणार आहे.

‘मुन्ना बदनाम’ असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यात सलमान कोणत्या रूपात दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News