सलमान खानने शेअर केला हिमेश रेशमियाच्या चित्रपटाचा टिजर

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • बॉलिवुड ऍक्टर - सिंगर हिमेश रेशमिया काही वेळासाठी फिल्म इंडस्ट्रिपासुन दुर होता. २०१६ मध्ये हिमेश "तेरा सुरुर" या चित्रपटामध्ये दिसुन आला होता.
  • त्यानंतर त्याच्या चित्रपटाची चाहते वाट पाहत होते. आता मात्र हिमेशच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

मुंबई :  बॉलिवुड ऍक्टर-सिंगर हिमेश रेशमिया काही वेळासाठी फिल्म इंडस्ट्रिपासुन दुर होता. २०१६ मध्ये हिमेश "तेरा सुरुर" या चित्रपटामध्ये दिसुन आला होता. त्यानंतर त्याच्या चित्रपटाची चाहते वाट पाहत होते. आता मात्र हिमेशच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण लवकरच त्याचा "हैप्पी हार्डी अँड हीर" चित्रपट येणार आहे. नुकतच दंबग स्टार सलमान खानने चित्रपटाचा टिजर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 

सलमान खान आणि हिमेश रेशमिया दोघांचीही मैत्री खुप जुनी आहे. हिमेशने, सलमान खानच्या अनेक चित्रपटांसाठी म्युजिक कंपोज केल आहे. नुकतच सलमान खानने हिमेशच्या "हैप्पी हार्डी अँड हीर" या चित्रपटाचा टिजर सोशल मिडीयावर शेअर केला. यासोबत सलमानने लिहलं, ' अरे वाह हिमेश!'. इन्ट्ररेस्टींग बोलायचं म्हणजे या चित्रपटाचा टिजर तब्बल तीन मिनिटांचा आहे. सध्याच्या चित्रपटांचे टिजर हे खुप छोटे असतात, मात्र हिमेशच्या सिनेमाचा टिजर वेगळाच आहे. 

चित्रपटाच्या टिजरमध्ये हिमेश डबल रोलमध्ये दिसुन येत आहे. एक हरप्रित सिंह लांबा म्हणजे हैप्पी आहे व दुसरा हर्षवर्धन भट्ट म्हणजे हार्डी आहे. मेकर्सच्या सांगण्यानुसार, या वर्षातील खुप मोठा म्युजिकल चित्रपट आहे. या चित्रपटात हिमेशसोबत पंजाबी एक्ट्रेस सोनिया मान दिसुन येणार आहे. या चित्रपटाचे  टाईटल पहिले "जट बट जुलियट" ठेवले होते, त्यानंतर हे टाईटल बदलुन "हैप्पी हार्डी अँड हीर" ठेवण्यात आले. येत्या सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News