सलमान म्हणतो.. 'हे' मला दिसतच नाही म्हणून कोणीही लग्नाची मागणी घातली नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

सलमानने अजूनही लग्न का केले नाही? या प्रश्नाचे उत्तर सलमानने दिले असून तो म्हणतो आतापर्यंत एकाही मुलीनं आपल्याला लग्नाची मागणी घातली नाही.

वयाची पन्नाशी कधीच ओलांडली तरी अभिनेता सलमान खाननं अजूनही सिंगलच आहे. तू लग्न कधी करणार? असा प्रश्न सलमानला नेहमी विचारला जातो. सलमानसोबत बॉलिवूडमध्ये करिअर सुरू केलेल्या बहुतेक सर्वच अभिनेत्यांची लग्न झाली, काहींची मुलंदेखील या क्षेत्रात आली आहेत. पण सलमानने अजूनही लग्न का केले नाही? या प्रश्नाचे उत्तर सलमानने दिले असून तो म्हणतो आतापर्यंत एकाही मुलीनं आपल्याला लग्नाची मागणी घातली नाही.

यापूर्वी सलमानचं नाव कतरिना कैफसह अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. सलमान बरेचदा त्याची कथित रशियन प्रेयसी लुलिया वंतूरसोबतही दिसतो. सलमानचा 'भारत' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला.  या चित्रपटात कतरिनानं सलमानला लग्नाची मागणी घातली असं एक दृश्य आहे. मात्र खऱ्या आयुष्यात माझ्यासोबत असं घडलं नाही, मला कोणीही  लग्नाची मागणी घातली नाही असं सलमान फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

कधीही कँडल लाइट डिनरचं आयोजन केलं नाही, मेणबत्तीच्या उजेडात मी काय खातोय हे मला दिसतच नाही म्हणून कदाचित मला कोणीही लग्नाची मागणी घातली नाही, पण याबद्दल अनेकदा मला वाईट वाटतं,  असं सलमान गंमतीनं या मुलाखतीत म्हणाला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News