पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतो सलमान खान; तर होणार पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काळवीट शिकार प्रकरणी कोर्ट सलमान खानचा जामीनच रद्द करण्याची शक्यता आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काळवीट शिकार प्रकरणी कोर्ट सलमान खानचा जामीनच रद्द करण्याची शक्यता आहे. कारण या खटल्यातील सुनावणीला सलमान खान हा हजरच राहत नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं आहे. जर कोर्टाने सलमानचा जामीन रद्द केला तर त्याला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते. त्यामुळे त्याला पुन्हा जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे सलमानची अडचण आता वाढली आहे

दरम्यान, मागील वर्षीच सलमानला याच खटल्यात जोधपूर कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जोधपूर कोर्टाने सलमान खानला फटकारलं आहे. जोधपूर कोर्टान स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की, 'काळवीट शिकार प्रकरणी जर सलमान खान पुढील सुनावणीसाठी कोर्टासमोर हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल.' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News