सलमान-भाग्यश्रीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

काजल डांगे
Saturday, 6 July 2019

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ चित्रपट पाहून लाखो तरुणी सलमान खानच्या प्रेमात पडल्या. 80 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांपैकी या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते.

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ चित्रपट पाहून लाखो तरुणी सलमान खानच्या प्रेमात पडल्या. 80 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांपैकी या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. सलमानबरोबरच अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने या चित्रपटात कमालीचा अभिनय केला. 

प्रेम-सुमन म्हणजेच सलमान-भाग्यश्रीची या चित्रपटामधील प्रेमकथा प्रत्येकाला आपलीशी वाटली. आधी मैत्री, त्यानंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर अशी साधी-सरळ या चित्रपटाची कथा. बॉलीवूडला अशा प्रकारची प्रेमकहाणी काही नवी नव्हती;

पण कथेची मांडणी आणि सलमान-भाग्यश्रीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटामधील रोमॅण्टीक गाणी तर गाजलीच; पण त्याचबरोबरीने सलमानने रोमॅण्टीक अंदाजात म्हटलेले संवाद विशेष लोकप्रिय ठरले. 

त्यातीलच एक संवाद म्हणजे, ‘दोस्ती का एक उसुल है मॅडम, नो सॉरी नो थॅंक्‍यू...’ सलमान भाग्यश्रीला गिफ्ट देताच ती त्याला थॅंक्‍यू म्हणते आणि भाग्यश्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेला या चित्रपटाचा नायक तिला लगेच या संवादामधून दोस्तीचे उसुल सांगतो.अगदी साधा संवाद; पण त्याचा प्रभाव आजही प्रेक्षकांवर आहे.

सूरज बारजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामधील लक्ष्मीकांत बेर्डे, आलोकनाथ, रिमा लागू, मोहनीश बहल यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News