या गाण्यावर सल्लू-प्रभुदेवा करणार एकत्र डान्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणे जगप्रसिद्ध झाल्यानंतर अभिनेता सलमान खान दबंग चित्रपटाच्या तिसऱ्या सीरिजमधून ‘मुन्ना बदनाम हुवा’ हे गाणे घेऊन येत आहे.

मुंबई : ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणे जगप्रसिद्ध झाल्यानंतर अभिनेता सलमान खान दबंग चित्रपटाच्या तिसऱ्या सीरिजमधून ‘मुन्ना बदनाम हुवा’ हे गाणे घेऊन येत आहे. या गाण्यात प्रभुदेवा आणि सलमान खान एकत्र थिरकताना दिसणार आहेत.

गाण्याला कोरिओग्राफ करून प्रभुदेवा सल्लूसोबत मनवेधक स्टेप्स करताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील एका स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. प्रभुदेवा आणि सल्लूला एकत्र  थिरकताना पाहायला प्रेक्षकांची उत्सुकता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News