सलीम-सुलेमानची जवानांसाठी संगीत मैफल  

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 January 2019

जवानांप्रती कलाकारांचं असणारं प्रेम प्रत्येक मालिका, चित्रपट आणि गाण्यांमधून दिसून आलं आहे. आता खास जवानांसाठी ‘९एक्‍सएम’ या वाहिनीने म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सुप्रसिद्ध गायक सलीम-सुलेमानने जवानांसाठी गाणी गात त्यांची मनं जिंकली. मुंबईतीलच आर्मी ग्राऊंडवर पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये जवळपास साडेतीन हजारांपेक्षा जास्त जवान उपस्थित होते. ‘जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गाणं गाण्याचा आनंद काही वेगळाच होता. भारतीय जवानांमुळे आज आपण सुरक्षित आहोत.

जवानांप्रती कलाकारांचं असणारं प्रेम प्रत्येक मालिका, चित्रपट आणि गाण्यांमधून दिसून आलं आहे. आता खास जवानांसाठी ‘९एक्‍सएम’ या वाहिनीने म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सुप्रसिद्ध गायक सलीम-सुलेमानने जवानांसाठी गाणी गात त्यांची मनं जिंकली. मुंबईतीलच आर्मी ग्राऊंडवर पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये जवळपास साडेतीन हजारांपेक्षा जास्त जवान उपस्थित होते. ‘जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गाणं गाण्याचा आनंद काही वेगळाच होता. भारतीय जवानांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्यासाठी गाणं गाण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो’, असे सलीम-सुलेमानने या वेळी म्हटले. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जवानांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News