सलीलचा ‘शिनेमा’

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 31 January 2019

सुप्रसिद्ध गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यांनी चित्रपटांसाठी केलेली गाणी खूप गाजली. आता सलील चक्क चित्रपट बनवतोय. ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन त्याचेच आहे. याचा टीझरही प्रदर्शित झालाय.

‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा’ असे गाण्याचे बोल या टीझरमध्ये ऐकायला मिळताहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्‍विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आदी कलाकार आहेत.

शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून एकत्र येतेय. ‘वेडिंगचा शिनेमा’ची निर्मिती घेरू आणि पीईएसबी यांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News