सलाम बॉम्बे फाऊंडेशनची कला अकादमी आता सुरू होणार पुण्यात!

रसिका जाधव
Saturday, 28 September 2019

पुण्यात पार पडणार कला महोत्सव, आंतर शालेय नाट्य, नृत्य व संगीत स्पर्धा २०१९

मुबंई: सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कला अकादमी अंतर्गत २०१८ मध्ये एका मोठ्या स्तरावर आंतर शालेय नाट्य, नृत्य व संगीत स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्देश अधिकाधिक मुलांपर्यंत कला पोहोचवणे व मुलांना त्यांची कला सादर करण्याकरिता एक रंगमंच उपलब्ध करून देणे हा होता. याच उद्देशाने मुंबईतील टी व एस वॉर्ड मधिल एकूण ३२ शाळांबरोबर ही स्पर्धा घेण्यात आली.

याच उद्धेशाने कला महोत्सव आंतर शालेय नाट्य व संगीत स्पर्धा सोमवारी (ता.३०) पुणे येथील जोत्सना भोळे सभागृह घेण्यात येणार आहे. यात एकूण ३२ शाळा, ४४८ विद्यार्थी व ४० शिक्षक यांचा समावेश असणार आहे. तसेच या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर,  पुणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी दीपक माळी, शिक्षण अधिकारी गणपत मोरे, इंस्क्ट्रर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत. 

तसेच ललित कला केंद्राचे प्रमुख केशवचै तन्य कुंटे, महाराष्ट्र कल्चर सेंटरचे सेक्रेटरी शुभांगी दामले, कलाकार धनंजय सरदेशपांडे डायरेक्ट्रर आणि थिएटर कामगार हे प्रमुख पाहुणे कला क्षेत्रातून उपस्थित असणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात येईल. या नंतर सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कला अकादमीची माहिती सांगण्यात येईल, ज्यामध्ये कला अकादमीत चालणाऱ्या एकूण ५ प्रकल्पांची माहिती व मुलांना उपलब्ध होणारे रंगमंच सांगितले जातील. 

अकादमीचा माहितीपर सुद्धा मुलांना दाखविण्यात येईल. याच बरोबर २०१८ मध्ये संपन्न झालेल्या कलामहोत्सवाची माहिती व्हिडीओद्वारे उपस्थित शाळांना दाखवण्यात येईल. कलामहोसवाद्वारे विजेत्या शाळेतील मुलांना मिळणारी संधी व त्याचे महत्त्व ही स्पष्ट करण्यात येईल. 

नाट्य, नृत्य स्पर्धेतून प्रत्येकी तीन क्रमांक व संगीत स्पर्धेतून २ क्रमांक काढण्यात येतील. प्रथम विजेत्या शाळेस ५,००० रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे, तसेच विजयी शाळेस करंडक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, विजयी शाळेचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. विजेत्या शाळेतील मुलांना प्रोफेशनल लेव्हलचे नाट्य, नृत्य व संगीताचे दीड वर्षाचे प्रशिक्षण त्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींद्वारे देऊन २०२१ साली एका मोठ्या स्तरावर पुन्हा एकदा कलामहोत्सव आयोजित करण्यात येईल व मुलांना आपली कला सादर करण्यासाठी एक मोठा रंगमंच उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना याच क्षेत्रात कला सादर करण्याची इच्छा असेल त्यांना आर्ट्स रेपेट्री कंपनीत सामील करण्यात येईल जेणे करून ते कलेशी जोडले जातील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News