'बाटला हाउस'चे नवे गाणं 'साकी-साकी' रिलीज; "दिलबर"नंतर पुन्हा नोरा फतेहीची जादु

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Monday, 15 July 2019

बॉलिवुड सुपरस्टार जॉन अब्राहम आणि मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुरचा आगामी चित्रपट 'बाटला हाउस'चे नवे गाणे 'साकी-साकी' रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये नोरा फतेही जबरदस्त डान्स करताना दिसुन येत आहे. 

मुंबई :  बॉलिवुड सुपरस्टार जॉन अब्राहम आणि मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुरचा आगामी चित्रपट 'बाटला हाउस'चे नवे गाणे 'साकी-साकी' रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये नोरा फतेही जबरदस्त डान्स करताना दिसुन येत आहे. 

'बटला हाउस' चित्रपट 2008 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या बाटला हाउस एनकाउंटरवर आधारित असुन जॉन अब्राहम एका पोलिस ऑफिसरची भुमिका साकारणार आहे.  

बॉलिवुडची डान्सिंग क्विन नोरा फतेही नेहमीच आपल्या डान्स व अदांनी सर्वांनाच घायल करत असते. पुन्हा एकदा नोराने 'ओ साकी-साकी' या गाण्यामध्ये जबरदस्त डांन्स करताना दिसुन आली आहे. नोराचा डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ  घालत आहे.

दरम्यान, नोरा फतेही लवकरच जॉन अब्राहम व मृणाल ठाकुरसोबत 'बटला हाउस' चित्रपटात झळकणार आहे. 2004मध्ये आलेला चित्रपट मुसाफिरच्या 'साकी साकी' या गाण्याच्या रिमेकमध्ये नोरा फतेहीने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला सिंगर तुलसी कुमार, नेहा कक्कड व बी-प्राकने आवाज दिला आहे. 'बटला हाउस' या चित्रपटातील नुकतच रिलीज झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News