गृहिणीची भूमिका साकरणार 'नंदिनी'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

अभिनेत्री नंदिता पाटकरची नॉन ग्लॅमरस, टिपिकल गृहिणीची भूमिका प्रेक्षकांना आपलंस करते. ‘एलिझाबेथ एकादशी’ सारख्या चित्रपटामध्ये तर नंदिताने कमालीचे काम केले. आता संजय दत्त आणि मान्यता दत्त निर्मित ‘बाबा’मध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे.

नंदिता म्हणते, मी या चित्रपटात ऐकू व बोलू न येणाऱ्या एका गृहिणीची भूमिका साकरत आहे. त्यामुळे संवादांमधून व्यक्त न होता माझे चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे यामधून मी व्यक्त होणार आहे.

या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी आनंददायी आणि सुखकर होता.’ या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. राज. आर. गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर आदी कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News