‘सकाळ रिलीफ फंडा’कडे २५ लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
  • जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी मदतीचे हजारो हात पुढे येत आहेत.

पुणे : पुरामध्ये वाहून गेलेले संसार उभे राहावेत, त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी मदतीचे हजारो हात पुढे येत आहेत. छोट्या मुलांनी खाऊसाठी जमविलेले पैसे, कोणी पेन्शनमधून जमवलेली रक्कम, कोणी बचत म्हणून बाजूला ठेवलेली पुंजी तर विविध संस्था-संघटना, गणेश मंडळे, व्यापारी, उद्योजक मदतीसाठी सरसावले आहेत. ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे आतापर्यंत २५ लाखांचा निधी जमा झाला असून, फंडाच्या वतीने राज्यभरातून विविध मदत पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास प्रारंभ झाला आहे.

कोल्हापूर, सांगली भागातील पूर ओसरू लागल्याने पुरामुळे निर्माण झालेली भीषणता सामोरी येत आहे.  या भागातील नागरिकांना उभे राहण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे. ती गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने राज्यभरात यंत्रणा उभी करण्यात आली आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले असून, त्यास सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळात आहे.

खाऊसाठी पिगी बॅंकेत जमा झालेल्या हजार रुपयांच्या रकमेपासून लाखो रुपयांपर्यंतची मदत फंडाच्या मदत केंद्रांवर जमा करण्यात येत आहे. आजअखेर सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. या रोख रकमेशिवाय औषधे, ब्लॅकेंट्‌स, धान्य, शैक्षणिक साहित्यही जमा केले जात असून, ते गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणा तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी ‘सकाळ’च्या वतीने समन्वय साधण्यात
 येत आहे.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News