दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली `सैराट`ची स्टोरी

हरी तुगावकर
Sunday, 9 June 2019

तीन वर्षीपूर्वी प्रदर्शित झालेल्या `सैराट` चित्रपटाने सर्वांचेच लक्षवेधून घेतले होते.एका विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत चक्क `सैराट`ची स्टोरीच लिहून काढल्याचा प्रकार लातूर विभागीय मंडळात घडला.

लातूर - तीन वर्षीपूर्वी प्रदर्शित झालेल्या `सैराट` चित्रपटाने सर्वांचेच लक्षवेधून घेतले होते. तरुणांना तर त्याची अधिकच भूरळ पडली. आर्ची अन परशा हेच सर्वत्र चर्चेत राहिले. त्याला विद्यार्थीही अपवाद ठरले नाहीत. अनेक वेळा चित्रपट पाहिल्याने अनेकांना या चित्रपटाच्या कथानकासोबतच त्याचे संवादही पाठ झाले. या चित्रपटाचे कथानक उत्तरपत्रिकेत लिहावे की नाही याचे भानही एका विद्यार्थ्याला राहिले नाही.

त्यामुळे एका विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत चक्क `सैराट`ची स्टोरीच लिहून काढल्याचा प्रकार लातूर विभागीय मंडळात घडला. खरे तर चित्रपटात काम करणाऱया आर्चीला दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले होते. पण इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत तीची स्टोरी लिहणाऱया या विद्यार्थ्याला गुणात मात्र `भूगोल` (शुन्य) मिळाला आहे.

दहावीच्या परिक्षेचा निकाल शनिवारी (ता.८) जाहिर झाला. लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी या निकालाची माहिती दिली. त्यात त्यांनी हा घडलेला खरा प्रकार गमतीने सांगितला असला तरी दहावी असतानाच विद्यार्थ्यांच्या मनावर चित्रपट कशा पद्धतीने परिणाम करतो आहे हे समोर येत आहे. या विभागात दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात होत्या.

इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने हा प्रकार केला असल्याचे उत्तरपत्रिका तपासणी करणाऱया शिक्षकांच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत `सैराट`चे कथानकच लिहिले होते. त्याने यात आर्ची आणि परशा उभा केला होता. आठवल तशी गाणी देखील त्याने लिहिली होती. हा सर्व प्रकार पाहून उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षकासोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आवाक झाले.

चित्रपटात काम करणारे आर्ची आणि परशा हे दोघेही आयुष्याच्या परिक्षेसोबतच दहावी बारावी सारख्या परिक्षेत देखील चांगले घेवून एक पाऊल पुढे टाकत आहेत. पण इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत आर्ची व परशाची `सैराट` स्टोरी लिहिणाऱया या विद्यार्थ्याला इतिहासाच्या पेपरला मात्र मोठा `भूगोल` (शुन्य) मिळाला आहे.

या विद्यार्थ्याने `सैराट`चा इतिहास लिहण्यापेक्षा दहावीच्या इतिहासाची पाने चाळून तो लिहला असता तर आयुष्यात तो पुढे गेला असता हे मात्र निश्चित आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News