सागरिकाचा पुन्हा हटके लुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

सागरिका घाटगे लवकरच ‘मॉन्सून फुटबॉल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यातील तिची प्रीतीची भूमिका प्रेक्षकांना भावली.

त्यानंतर ती ‘प्रेमाची गोष्ट’, ‘फॉक्‍स’, ‘इरादा’सारख्या हिंदी चित्रपटात दिसून आली. आता ती अजून एका मराठी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.

ती लवकरच ‘मॉन्सून फुटबॉल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक स्त्री-प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटात गृहिणींना फुटबॉल खेळण्याची आवड असते आणि ती आवड ते त्यांच्या रोजच्या जीवनशैलीतून कशी पूर्ण करतात, हे दाखवण्यात येणार आहे.

नुकतेच तिने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. मिलिंद उके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News