सैफ-आमीरचा चोर पोलिसांचा खेळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • ‘विक्रम वेधा’ या तमीळ चित्रपटाचा हिंदी रिमेक
  • आघाडी कलाकार सैफ आणि आमीर
  • दोघेही पुन्हा एकदा एका चित्रपटासाठी एकत्र

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि आमीर खान हे बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार. ‘दिल चाहता है’, ‘परंपरा’सारख्या चित्रपटांमध्ये हे दोघेही एकत्र दिसून आले होते. या चित्रपटानंतर आता हे दोघेही पुन्हा एकदा एका चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’ या तमीळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सैफ-आमीर एकत्र पाहायला मिळणार असल्याच्या बऱ्याच चर्चा आहेत. या तमीळ चित्रपटात अभिनेता आर. माधवन आणि विजय सेनापती मुख्य भूमिकेत होते. त्या वेळी हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता.

या चित्रपटातील आर. माधवनने साकारलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका हिंदी रिमेकमध्ये सैफ साकारणार आहे; तर खलनायकाची भूमिका विजय सेनापतीने साकारली होती. ती या चित्रपटात आमीर साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. पुढील वर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News