प्रदर्शित होण्याआधीच "सेक्रेड गेम्स 2", नेटफ्लिक्सवर पाहता येईल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019
  • 'सेक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सिझनची उत्सुकता
  • 14 ऑगस्ट रोजी एक दिवस आधीच पाहता येणार
  • सीरिज पाहण्यासाठी युजर्सना आधी नोंदणी करावी
  • नेटफ्लेक्सने यासंदर्भातली घोषणा केली

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे पण याच दिवशी  आणखी एका गोष्टींची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे ती म्हणजे 'सेक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सिझनची आणि हया नेटफ्लिक्सवर दुसरा सिझन प्रदर्शित होण्यापूर्वी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी एक दिवस आधीच पाहता येणार आहे.

पहिल्या सिझनच्या कथेने प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण केली होती की, आता दुसरा सिझन कधी प्रदर्शित होतोय असे सगळ्यांनाच वाटू लागले आहे. ज्यांच्याकडे वनप्लस स्मार्टफोन आहे, त्यांना एक दिवस आधीच सेक्रेड गेम्स 2 पाहता येणार आहे. नेटफ्लेक्सने यासंदर्भातली घोषणा केली आहे. हेच नाही तर वनप्लस कम्युनिटीच्या मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू याठिकाणी या बहुप्रतिक्षित वेब सीरिजची स्क्रिनिंग ठेवण्यात येणार आहे. 

कसं पाहता येणार?
वनप्लस स्मार्टफोनवर ही सीरिज पाहण्यासाठी युजर्सना आधी नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या युजर्सना दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत सेक्रेड गेम्स २ चा पहिला एपिसोड पाहता येईल. नेटफ्लिक्स दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून स्पेशल स्क्रिनिंगची तिकीटं विकली जातील

कुठे पाहता येणार?
मुंबई- पीव्हीआर फिनिक्स मॉल, लोअर परेल- संध्याकाळी सात वाजता
दिल्ली- पीव्हीआर इसीएक्स चाणक्य, चाणक्यपुरी- रात्री आठ वाजता
बेंगळुरू- पीव्हीआर फोरम मॉल, कोरमांगला- रात्री आठ वाजता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News