अभिजित बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • अभिजीत बिचुकलेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री?

  • सोशल मीडियातही बिचुकलेची जोरदार चर्चा
  • साता-याचे अभिजीत बिचुकलेच येणार बिग बॉसमध्ये परत?

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वाचा स्पर्धक अभिजीत बिचुकलेवर खंडणी प्रकरणी तक्रार नोंदवून त्यांना अटक केलं होत. मात्र, आता अभिजीत बिचुकलेच्या चाहत्यांसाठी आंदची बातमी आहे. अभिजीत बिचुकले यांची सुटका झाली असुन लवकरच बिचुकले पुन्हा एकदा बीग बॉसच्या घरात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

बिग बॉस मराठी२ च्या चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक अभिजीत बिचुकले. याच बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. आता बिचुकलेची पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्रीची चर्चा आहे. मात्र, आता अभिजीत बिचुकलेंवर केलेली तक्रारही मागे घेतली असुन, अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

अभिजीत बिचुकले वादात सापडल्यानंतर बिग बॉस २ चा प्रर्व चांगलाच रंगला आहे. तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने आता बिचुकलेंना मोठा दिलासा मिळाला असून त्याचा बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच सोशल मीडियातही याची जोरदार चर्चा रंगल्याचं पहायला मिळत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News