भाजपाचं उदो उदो करणाऱ्या चित्रा वाघ यांना रुपाली चाकणकरानीं सुनावले

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Monday, 11 November 2019

 पक्ष सोडताना तत्त्व नाही, तर सत्तेचं लोणी दिसलं होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरुन चित्रा वाघ यांच्यावर  नाव न घेता निशाणा साधला.

मुंबई : सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे, अभिमानास्पद निर्णय ! असं ट्वीट करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपाची पाठराखण केली. मात्र राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या त्या ट्विटवर चांगलाच निशाना साधला.

सेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!’ हे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर अकाऊण्टवरुन पोस्ट करण्यात आलं. हे ट्वीट कोट करत चित्रा वाघ यांनी ‘सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे….अभिमानास्पद निर्णय !!!’ असं लिहत ट्विट केले होते. 

 

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘देर आये…दुरूस्त आये. ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागलेत, त्यावेळी फक्त सत्तेचे लोणी दिसत होते…..पराजय मान्य करायला वृत्ती खिलाडू असावी लागते….’ अशी पोस्ट चाकणकरांनी  केली आहे.

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News