विक्रमांचा बादशाह : विराट 'किंग' कोहली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शतकी खेळी केली. त्याच वेळी तो दशकात तिन्ही प्रकारात मिळून वीस हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

त्रिनिनाद : विक्रमवीर, विक्रमादित्य अशी विशेषणे त्या-त्या फलंदाजांनी केलेल्या विक्रमांनंतर लावण्यात आलेली आहेत; पण किंग विराट कोहली त्याहूनही मोठी झेप घेत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शतकी खेळी केली. त्याच वेळी तो दशकात तिन्ही प्रकारात मिळून वीस हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (१५,९६२), दी वॉल राहुल द्रविड (१५८५३), ऑस्ट्रेलियाचा रनमशिन रिकी पाँटिंग (१८,९६२) आणि सर्वोत्तम अष्टपैलून जॅकस्‌ कॅलिस (१६,७७७) आणि श्रीलंकेची सातत्यपूर्ण जोडी कुमार संगकारा १५,९९९) तसेच माहेला जयवर्धने (१६,३०४) यांनाही जे जमले नाही, ते कोहलीने करून दाखवले.

दशकात वीस हजार धावा करणारा पहिला फलंदाज
दशकातील एकमेव वीसहजारी मसनसबदार होताना विराटने केलेले आणखी काही विक्रम आणि आवाक्‍यात आणलेले विक्रम पुढील प्रमाणे-

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके

 • २२ रिकी पाँटिंग (२२० इनिंग)
 • २१ विराट कोहली (७६*)
 • १३ एबी डिव्हिल्यर्स (९८)
 • ११ सौरव गांगुली (१४३)

एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके

 • ९ विराट कोहली वि. वेस्ट इंडीज (३५ इनिंग*)
 • ९ सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया (७०)
 • ८ विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया (३५)
 • ८ विराट कोहली वि. श्रीलंका (४६)
 • ८ सचिन तेंडुलकर वि. श्रीलंका (८०)

वेस्ट इंडीजमध्ये सर्वाधिक शतके

 • ४ विराट कोहली 
 • ३ मॅथ्यू हेडन
 • ३ हाशिम आमला
 • ३ ज्यो रूट

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News