रुचिता जाधव ‘लखनवी’ भुमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

सध्या ती सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘ये उन दिनों की बात है’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.

अभिनेत्री रुचिता जाधवला खरी प्रसिद्ध मिळाली ती ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे.

त्यानंतर ती ‘भविष्याची ऐशी तैशी’, ‘आता माझी हटली’ यांसारख्या चित्रपटात झळकली. 

सध्या ती सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘ये उन दिनों की बात है’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत ती एका लखनवी मुलीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी सध्या ती लखनवी भाषा शिकत आहे.

शब्दोच्चार सुधारण्यासाठी एक शिक्षकही तिच्या मदतीला असतो. ‘लखनवी भाषा शिकणे थोडे जड गेले; पण सेटवरील सर्वच मंडळींनी मला खूप मदत केली’, असे रुचिता सांगते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News