पालकांसोबत मुलांनीही सोडली ‘आरटीई’ची आशा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीई) प्रवेशासाठीच्या दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा पालकांना लागली आहे.

औरंगाबाद - शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीई) प्रवेशासाठीच्या दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा पालकांना लागली आहे. दरम्यान, १७ जूनपासून शाळांना सुरवात होत आहे. असे असताना आरटीईच्या दुसऱ्या फेरीला सुरवात होत नसल्याने पालकांची तारांबळ उडाली असून, त्यांनी आता आरटीई प्रक्रियेची आशा सोडली असून, मुलांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांचे दरवाजे ठोठावण्यास सुरवात केली आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातून तीन हजार ९० पालक ‘आरटीई’च्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत आहेत.

शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे व सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया खोळंबलेली आहे. दरम्यान, आता पालाकांनी दुसऱ्या फेरीची आशा सोडली असून, आपल्या पाल्यासाठी खासगी शाळेची वाट धरत आहेत.

तब्बल ६५ टक्के जागा रिक्त
दरवर्षी आरटीईची प्रक्रिया मे महिन्यात संपते. यंदा पहिल्यांदाच शासनाने राज्यस्तरावरून ही प्रक्रिया राबविली. अद्याप जिल्ह्यातून फक्त अडीच हजार प्रवेश निश्‍चित झाले असून, ३ हजार ९० जागा म्हणजे ६५ टक्के जागा रिकाम्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News