प्लास्टिकबंदीमुळे झाले, २० हजार कोटींचे नुकसान, कसे झाले बदल, पाहा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 May 2019

पर्यावरण हितासाठी राज्य सरकारने गतवर्षी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली; मात्र प्लास्टिक उद्योजकांना इतर पर्याय न दिल्याने हजारो उद्योजकांनी महाराष्ट्रातील व्यवसाय गुंडाळला. यामुळे प्लास्टिक उद्योग, पॅकेजिंगशी संबंधित १० ते १५ हजार रोजगार बुडाला. त्याशिवाय या उद्योगातून मिळणारा सुमारे २० हजार कोटींचा कर महसूल सरकारला गमवावा लागला. बहुतांश प्लास्टिक उद्योजक दिव-दमण, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये स्थलांतरित झाले.

असे झाले स्थलांतर...

मूळ ठिकाण स्थलांतराचे ठिकाण
मुंबई, ठाणे, पालघर वापी, वलसाड, दिव-दमण, सिल्व्हासा
कोल्हापूर बेळगाव
पुणे बेंगळूरु
नागपूर मध्य प्रदेश, छत्तीसगड

धोरण ठरणार निर्णायक
राज्य सरकारने नुकतेच नवे औद्योगिक धोरण जाहीर केले आहे. यात सर्व क्षेत्रांतील उद्योजकांना कर सवलती, भांडवली साह्य, मुबलक जमीन उपलब्ध केली आहे. राज्यात उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतर रोखण्यासाठी औद्योगिक धोरण निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, उद्योगांच्या स्थलांतराबाबत राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News