बामू मधील "स्त्री अभ्यास"ची आरआरसी तेरा महिन्यापासून रखडली 

अतुल पाटील 
Saturday, 3 August 2019

औरंगाबाद : पीएच. डी. साठीची पेट परीक्षा होऊन तीन वर्ष उलटली तरी, आरआरसी (संधोधन मान्यता समिती) च्या मुलाखती काही झाल्या नाहीत. स्त्री अभ्यास विषयाच्या विद्यार्थ्यांना एकदा नव्हे तर, दोनदा हुलकावणी बसली आहे.

कंटाळलेले विद्यार्थी निवेदने देण्यापलीकडे काही करु शकत नाहीत. याला नवनिर्वाचित कुलगुरु किती गांभिर्याने घेतात, यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव विज्ञान शाखेअंतर्गत स्त्री अभ्यास विषयाच्या विद्यार्थ्यांनी 2016 मध्ये पेट परीक्षा दिली होती. 

विद्यापीठाच्या निर्देशानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करुन त्याप्रमाणे संशोधन निवडून गोषवारा (सिनॉप्सिस) शुल्कासहित नियोजित तारखेत दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे वैध विद्यार्थ्यांची यादी जाहीर करुन आरआरसीच्या मुलाखतीची तारीख 3 जुलै 2018 ला ठरल्या. तसेच संकेतस्थळावरही जाहीर करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पुन्हा दुसऱ्या परिपत्रकाद्वारे अरेबिक, पाली व बुद्धिझम, फुले व आंबेडकर यांचे विचार, स्त्री अभ्यास, संस्कृत, विधी आदी विषयाची प्रशासकीय कारणामुळे आरआरसीच्या मुलाखती रद्द केल्याचे कळविले होते. त्यानंतर 12 डिसेंबर 2018ला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संस्कृत, पाली व बुद्धिझम, विधी, फुले व आंबेडकर यांचे विचार या विषयाच्याच मुलाखती 15 आणि 17 डिसेंबरला घेण्यात आल्या. त्यात स्त्री अभ्यास विषयाचा मात्र उल्लेख केला नव्हता. 

विद्यार्थ्यांनी दिले होते निवेदन 
पहिली तारीख जाहीर झाल्यापासून आजतागायत तेरा महिने उलटले. तरीही स्त्री अभ्यास विषयाच्या मुलाखती न झाल्याने विद्यार्थी गेल्या सात महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत दोन महिन्यापूर्वी कुलगुरु, अधिष्ठाता, उपकुलसचिव, संचालिका यांना निवेदन देण्यात आले होते. यावर आरती जावळे, किरण बोरकर, अर्चना गायकवाड, ज्ञानदा पाठक, मंजुश्री लांडगे, अशोक बाविस्कर यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले आहे. नवनियुक्‍त कुलगुरु आमची मागणी मार्गी लावतील, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News