क्रिती साकारणार पत्रकाराची भूमिका

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • क्रितीचा हा आगामी सिनेमा  थ्रिलर असून लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरवात होणार आहे.
  • या सिनेमामध्ये क्रिती एका पत्रकार महिलेची भुमिका साकारणार आहे.

मुंबई : बॉलिवुड ब्यूटीगर्ल क्रिती सनॉने कमी कालावधीत लोकप्रियतेच शिखर गाठल आहे. हिरोपंती या चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण करुन आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक चित्रपट केले आहेत. ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’,’दिलवाले’, ‘कलंक’, लुका-छुपी अशा अनेक  चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती लवकरच आता दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असल्याच समजतय. 

क्रितीचा हा आगामी सिनेमा  थ्रिलर असून लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरवात होणार आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका पत्रकार महिलेची भुमिका साकारणार आहे. या भुमिकेसाठी क्रिती मेहनत घेताना दिसुन येते.

तसच, या चित्रपटामध्ये क्रितीने साकारलेली भूमिका ही प्रचंड शक्तिशाली पत्रकार महिलेची आहे. त्यामुळे ही साकारलेली भूमिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि प्रेक्षक या भूमिकेला स्वत:च्या आयुष्यशी जोडण्याचा प्रयत्न करतील, असं क्रितीने तिच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितलं.

त्यासोबत, या चित्रपटाची निर्मिती सुनीर करत असून, हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याकरीता चित्रपटाच्या तयारीसाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खास वर्कशॉप ठेवलं आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News