राष्ट्रीय स्तरावर पोचली मल्लखांबाची दोरी 

यिनबझ टीम
Thursday, 24 January 2019

जिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या शाळेचा पट १२५ असून, त्यापैकी तब्बल ४५ मुली मल्लखांब शिकत आहेत. १९९९ पूर्वी ही शाळा जिल्हा परिषदेच्या इतर शाळांप्रमाणेच होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या अन्‌ शाळेत शौर्याचा कित्ता गिरवला जाऊ लागला. शाळेच्या पटांगणात मोठा पार (दगडाचा चौथरा) आण

जिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या शाळेचा पट १२५ असून, त्यापैकी तब्बल ४५ मुली मल्लखांब शिकत आहेत. १९९९ पूर्वी ही शाळा जिल्हा परिषदेच्या इतर शाळांप्रमाणेच होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या अन्‌ शाळेत शौर्याचा कित्ता गिरवला जाऊ लागला. शाळेच्या पटांगणात मोठा पार (दगडाचा चौथरा) आणि त्याला लागून असलेले जुने मोठे वडाचे झाड हेच त्यांचे ‘स्टेडियम’ बनले. त्या झाडाच्या फांदीला दोर बांधून मुलींचा सराव सुरू झाला. लवचिकता, गती, प्रसरणशीलता, धाडस, ताकद या बळावर मुलींनी यशाची शिखरे गाठली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News