आदित्यपेक्षा रोहित पवार गर्भश्रीमंत; रोहित आहे इतक्या कोटींचा मालक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 October 2019

सगळ्या महाराष्ट्राचं ज्या दोन तरुणांकडे लक्ष आहे ते म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे आणि त्यांचेच राजकिय स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांच्याकडे.

मुंबई - येणारी विधानसभा ही तरुण राजकर्त्यांची असल्याचे काही प्रमाणात म्हटले जात असतानाच या निवडणूकीत अनेक तरुण राजकर्त्यांनी आपलं नशिब आजमवण्यासाठी राजकारणात उडी घेतली आहे. त्यातचं सगळ्या महाराष्ट्राचं ज्या दोन तरुणांकडे लक्ष आहे ते म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे आणि त्यांचेच राजकिय स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांच्याकडे. आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून तर रोहित पवार कर्जत-जामखेड मतदार संघातून रिंगणात उभे आहेत. 

या दरम्यान दोघांनीही निवडणूक निर्णय आयोगाकडे उमेदवारीचा अर्ज भरतेवेळी त्यांच्याकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमेत्ताचा तपशील सादर केला असता, रोहित पवार यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्याहून अधिक संपत्ती असल्याचे उघड झाले.

आदित्य ठाकरे यांच्या नावे
10 कोटी 36 लाख रुपयांची बँक ठेवी 
20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स 
साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक
64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा समावेश
10 लाख 22 हजार इतर रक्कम 
एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

राहित पवार यांच्या नावे 
3 लाख 76 हजार रुपये रोकड
बँक खात्यात 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये
9 कोटी 65 लाख रुपयांची बॉन्ड, शेअर्स, म्यूचुअल फंड्समध्ये गुंतवणूक
11 लाख 21 हजाराचं सोनं (पत्नी कुंतीकडे 67 लाखाचं सोनं) 47 हजाराची चांदी
1 लाख 68 हजाराचे हिरे
4 लाख 52 हजार इतर दागिने
28 लाखांची महागडी घड्याळं
5 कोटी रुपयांची शेतजमीन, घर, फ्लॅट (आत्ताच्या बाजारभावानुसार किंमत 24 कोटी रुपये)
12 लाख रुपयांच्या दुचाकी
3 कोटी 46 लाख रुपयांची वडिलोपार्जीत मालमत्ता
3 कोटी 74 लाख रुपयांच बँकेचं कर्ज
एकूण 18 कोटी 40 लाख 45 हजार रुपये

एकंदरित यानुसार आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा रोहित पवार गर्भश्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News