या गोष्टीत रोहित पवार आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे सर्व महाराष्ट्राची नजर लागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे असून या दिग्गज उमेदवारांत चुरस निर्माण झाली आहे. 

जामखेड: कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे सर्व महाराष्ट्राची नजर लागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे असून या दिग्गज उमेदवारांत चुरस निर्माण झाली आहे. 

सगळीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना एका गोष्टीत रोहित पवारांनी मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिल्या टप्प्यात 3 लाख 16 हजार 70 रुपयांचा खर्च सादर करून खर्चात आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे यांनी 1 लाख 24 हजार 80 रुपयांचा खर्च सादर केला आहे.

कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या प्रत्येक हालचाली व प्रचारावर निवडणूक विभागाच्या कॅमेऱ्याची नजर असून मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिल्या टप्प्यातील पडताळणी शुक्रवारी करण्यात आली.

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होत असलेल्या खर्चाची माहिती निवडणूक विभागाच्या खर्च नियंत्रण समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी निवडणुकीकरीता स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक असून दहा हजारापर्यंतचे देणे रोखीने तर त्यापुढील देणे धनादेशाद्वारे देण्याचे आदेश आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News