राष्ट्रवादीचे दोन 'युवा रोहित' माणदेशात एकत्र येणार!

संपत मोरे
Saturday, 26 January 2019

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे दोन युवा नेते २७ जानेवारीला सांगली जिल्हयातील दिघंची गावात युवा शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे हा मेळावा ज्यांनी आयोजित केला आहे त्यांचेही नाव रोहित आहे आणि ते आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याला महत्व आहे. 

विशेष म्हणजे हा मेळावा ज्यांनी आयोजित केला आहे त्यांचेही नाव रोहित आहे आणि ते आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याला महत्व आहे.  

इंडियन शुगर मिल्स असोशियनचे अध्यक्ष रोहित पवार सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. कर्जत, हडपसर, पुरंदर येथून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पवार यांनी याबाबत अजून भाष्य केलेले नाही. 

आर आर पाटील यांचे पुत्र शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत यांनी २०२४सालचे आमचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील असं सांगत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीपासूनच ते त्यांच्या आई आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसतील आणि नंतर थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. 

या युवा शेतकरी मेळाव्यात आटपाडी तालुक्यातील दुष्काळ, डाळिंब शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, अपुऱ्या राहिलेल्या पाणीयोजना या विषयी चर्चा होणार आहे. रोहित पवार आणि रोहित पाटील यांची आजवर एकदाही भेट झालेली नाही या मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीच्या पवार घराण्याची तिसरी पिढी आणि अंजनीच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी एकत्र येत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News