रोहित पवार-अमित ठाकरेंच्या भेटीने चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • पवार-ठाकरे घराण्याची मैत्री
  • चर्चा नेमक्‍या कोणत्या विषयावर झाली ते समजू शकले नाही.
  • या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. या दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली; मात्र ही चर्चा नेमक्‍या कोणत्या विषयावर झाली ते समजू शकले नाही. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

फिनिक्‍स मिल कम्पाऊंडमधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघे दुपारी १.३० च्या सुमारास एकत्र जेवले. तत्पूर्वी सकाळीच रोहित यांनी अमित यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून जवळीक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्यावे, असा सूरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

पवार-ठाकरे घराण्याची मैत्री
राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यांनी एकमेकांवर अनेकदा सडकून टीकाही केली होती; मात्र या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीचे नाते अतुट होते. तसे किस्से आजही ऐकायला मिळतात. पवार आणि ठाकरे घराण्यातील हेच मैत्रीचे बंध जपण्याचे काम तिसरी पिढी करत असल्याची चर्चा दिवसभर होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News