कॉलेज परिसरात रोडरोमिओची ऑन ड्युटी सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही अत्यावश्यक; दामिनी पथकाकडून कडक कारवाईची गरज

खामगाव - ऊन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यांनंतर शहरातील शाळा,महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या  विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला असतो. हीच संधी साधत शहरातील काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालये किंवा बसस्थानकावर जावून टोळ्या जमवून टवाळक्या करतात. तसेच काही भागात मोटारसायकलवरून विनाकारण हॉर्न वाजवित चित्रविचित्र आवाज काढतात व विद्यार्थिंनींना त्रास देतात. त्यामुळे काही ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे  लावण्याची व दामिनी पथकाकडून अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी खामगाव येथे शिक्षणासाठी येतात. यामध्ये मुलींच्या संख्या देखील जास्त असते अशावेळी विद्यार्थींनींना शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर बसस्थानकावर बसुन बसची वाट पाहणे भाग असते. हीच संधी साधत रोडरोमिओ मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात त्या ठिकाणी चकरा मारणे, मोटारसायकलवरुन विनाकार हॉर्न वाजवीत जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार करतात. यातील  काही तर शहरातून धुम स्टाईलमध्ये आपली गाडी पळवून गाडीद्वारे कर्कश आवाज काढतात. त्यामुळे मोठे अपघात देखील घडतात. 

या सर्व प्रकारांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून काही पालक दहावीनंतर नाईलाजास्तव मुलींचे शिक्षण हे त्यांच्या गावातील महाविद्यालयात करतात किंवा पुढे शिकवतच नाही.  काही घटना अशाही आहेत कि, ज्यामध्ये पालकांकडून आपले शिक्षण थांबविल्या जाईल किंवा त्याचे मोठ्या भांडणामध्ये रुपांतर होईल या भीतीपोटी अनेक विद्यार्थिंनी त्यांच्यासोबत घडत असलेले प्रकार घरी पालकांना सांगत नाही.

त्यामुळे पोलिस प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेवून उपरोक्त परिसरात तरी सिसीटीव्ही बसवावे व दामिनी पथकाकडून होणारी कारवाई अधिक कठोर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News