विलासरावांच्या आठवणीने रितेश झाला भावुक, स्मृतिदिनानिमित्त केलं भावनिक ट्विट

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नते विलासराव देशमुख यांचा आज (बुधवार) सातवा स्मृतीदिन असून, त्यानिमित्त रितेश देशमुखने ट्विट करून मिस यू पापा असे म्हटले आहे.

लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नते विलासराव देशमुख यांचा आज (बुधवार) सातवा स्मृतीदिन असून, त्यानिमित्त रितेश देशमुखने ट्विट करून मिस यू पापा असे म्हटले आहे.

राज्यभरातून आज विलासराव देशमुखांना अभिवादन करण्यात येत आहे. लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात पूर्ण देशमुख कुटुंबाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रितेशने ट्विट करत म्हटले आहे, की सात वर्षांचा काळ खूप मोठा आहे. मला हे काल झाल्यासारखेच वाटत आहे. मिस यू पापा...

लोकांतील...लोकांचे...लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली!, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News