राष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखने व्यक्त केलं मत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 November 2019
  • राज्यात काय सुरु आहे, याची माहिती सर्वानाच आहे. मला वाटत की, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीला कौल मिळाला होता.
  • तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात बसणार हे जवळपास ठरलं होतं.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट लागू केल्याने सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील यावर आपले मत मांडले, असे असताना अभिनेता रितेश देशमुख याने आपलं मत मांडले आहे. "महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं" असं तो म्हणाला.   

राज्यात काय सुरु आहे, याची माहिती सर्वानाच आहे. मला वाटत की, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीला कौल मिळाला होता. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात बसणार हे जवळपास ठरलं होतं.

मात्र तसं काही झालं नाही. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेनं राज्यपालांकडे वेळ मागितली, पण त्यांना ती दिली नाही आणि त्यानंतर राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली. सध्या राज्याला स्थिर सरकार हवं आहे असं मला वाटतं. मला राजकीय पार्श्वभूमी असली तरी, या देशाचा एक नागरिक आणि एक मतदार म्हणून मला या राज्यात पाच वर्षांचे स्थिर सरकार हवे आहे,' असे रितेश म्हणाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News