दलित तरुणाशी लग्न केल्याने जीवाला धोका; भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • जर आम्ही या गुंडांच्या ताब्यात सापडलो, तर ते नक्कीच आम्हाला जीवे मारतील, असेही साक्षी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

मुंबई : दलित तरुणाशी लग्न केल्याने माझे वडील आम्हाला मारण्याची शक्यता आहे, तसेच यासाठी त्यांनी काही गुंड देखील पाठवले आहेत. आम्हाला पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी उत्तरप्रदेश येथील भाजपच्या आमदाराच्या मुलीने केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  

साक्षी मिश्रा (वय २३) असं या मुळीच नाव असून उत्तर प्रदेशमधील बरैली जिल्ह्यातील बिठारी चैनपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची ती मुलगी आहेत. अजितेश कुमार यांच्याशी लग्न केल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. 

या व्हिडिओमध्ये साक्षी मिश्रा हिने म्हटले आहे की, अजितेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांपासून लांब राहावे. त्यांना कोणताही त्रास देऊ नये. मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. पण माझ्या वडिलांना ते मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. गुंडापासून वाचण्यासाठी आम्ही सतत इकडे तिकडे धावपळ करीत आहोत. पण आम्हाला आता याचा कंटाळा आला आहे. आम्हाला आता पोलीस संरक्षण दिले जावे.

जर आम्ही या गुंडांच्या ताब्यात सापडलो, तर ते नक्कीच आम्हाला जीवे मारतील, असेही साक्षी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये अजितेश कुमारही बोलताना दिसतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. तिथे काही गुंड आले होते. आम्ही अगदी थोडक्याच बचावलो, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, या व्हिडिओबद्दल भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिस उपमहानिरीक्षक आर के पांडे म्हणाले, मी हा व्हिडिओ बघितला आहे आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना संबंधित दाम्पत्याला पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या घटनेचा सैराट होण्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News