मेंदूच्या पक्षाघातावर मात करत ऋषिकेश माळीचे यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • म्हसाळ्यातील ऋषिकेश माळीचे यश
  • स्टिफन हॅंकिंगचा प्रभाव

अलिबाग : जिद्द, चिकाटी, तसेच यशस्वी होण्याची आकांक्षा असेल तर अशक्‍य ते शक्‍य होऊ शकते, हे म्हसळ्यातील ऋषिकेशने दाखवून दिले आहे. जन्मताच सेरेब्रल पाल्सी’ म्हणजे मेंदूचा पक्षाघात आजार असताना त्यावर मात करत त्याने दहावीच्या परीक्षेत ८६.६० टक्के गुण मिळवले.

‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल- म्हसळा शाळेतील ऋषिकेश शीतल सुदाम माळी या विद्यार्थ्याने दहावी सेमीइंग्रजी माध्यमात ५०० पैकी ४३३ गुण मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले. तसेच दिव्यांग प्रवर्गात ऋषिकेशने प्रथम क्रमांक मिळवला.

स्टिफन हॅंकिंगचा प्रभाव
इयत्ता १० वी अभ्यासक्रमातील अरुणिमा सिन्हा, वैज्ञानिक स्टिफन हॅंकिंग यांच्या जीवनावरील वेगवेगगळ्या पुस्तकांमधून जीवनावर प्रभाव टाकल्याचे त्याने सांगितले. तसेच विज्ञानातील ‘स्टेम-सेल’ थेरेपी या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतः अनुभव घेतला. उपचारांनंतर मार्च महिन्यात थेरपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखीने त्रस्त असतानाही सर्व त्रासाशी झुंजत स्वतः हाताने पेपर लिहून यशाचे शिखर गाठले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News