अभिनेता 'विजय'च्या निधनाचे वृत्त आणि ट्विवरवर #RIPActorVijay ट्रेंड; खरंच असे काही घडले?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

तमिळ चित्रपट क्षेत्रातील दिग्गज अभिनेता विजय हा दक्षिणेत सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. विजयची फॅन फॉलोईंगही मोठ्या प्रमाणात आहेत. विजय सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून ट्विवरवर #RIPActorVijay असा ट्रेंड पाहायला मिळाला. विजयच्या निधनाचे वृत्त सर्वत्र पसरले आणि सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. पण खरंच असे काही घडले का? याबाबत सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजयच्या निधनाची अफवा असून तो व्यवस्थित असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली असून विजयच्या मृत्यूची बातमी खोटी असून विजय जिवंत आहे. त्याला काहीही झालेलं नाही.<

>

विजयच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याची समजल्यावर त्याचे फॅन्स ट्विटरवर #LongLiveVIJAY असा ट्रेंड सुरु केला आहे. <

>

तसेच तमिळ अभिनेता अजित याच्या फॅन्सनी हा ट्रेंड तयार केल्याचा आरोप विजयच्या फॅन्सनी सोशल मीडियावर व्यक्त होताना केला आहे. <

>

ट्विटर ट्रेंडवरून जगामध्ये काय घडत आहे, हे समजण्यास मदत होते. परंतु, काहीवेळा चुकीचे ट्रेंड पाहायला मिळतात. बर्‍याचवेळा असे घडते की, एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अफवा पसरते. मग, हे वृत्त वाऱ्यासारखे इंटरनेट सोशल मीडियावर पसरते. अभिनेते मॉर्गन फ्रीमॅनच्या बाबतीतही असेच घडले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News