राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रिद्धी गावंडे पात्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 14 November 2019

वर्धा: अग्रगामी हायस्कूल पिंपरी येथील दहाव्या वर्गात शिकत असलेली कु. रिद्धी सुनील गावंडे हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नुकतेच पार पडले. कुमारी रिद्धी गावंडेने तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर सुद्धा अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.      

नुकत्याच भंडारा येथे झालेल्या झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विभाग स्तरावर वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना 17 वर्षाखालील मुलींच्या 49 किलो वजन गटात तिने प्रथम क्रमांक घेऊन हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी तिला मार्गदर्शक म्हणून तुषार भवरे, रोहन सयाम, सागर डकरे, 360 फिटनेस क्लबचे संचालक विनीत टावरी यांचे मार्गदर्शन लाभले.
    
श्रीकृष्णदास जाजू महाविद्यालयाच्या जिमखान्यात पिंपरी येथे सतत तीन वर्ष प्रॅक्टिस करून या स्पर्धेत यश मिळवले. या स्पर्धेसाठी शाळेचे शिक्षक कृष्णा खोडे, बर्डे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर दीपा व वर्गशिक्षक अर्चना महाभोगे यांनी प्रोत्साहन दिलं. या यशाबद्दल डॉ. प्रा. सुशील चव्हाण, श्रुतिका देवतळे, सायली नोकरकर, अनिल महाजन, पालक प्राचार्य सुनील गावंडे प्रा. नीतू गावंडे, यांनी कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News