नवयुवक दुर्गा मंडळाचा उपक्रम; क्रांतीदिनी वाहिली हुतात्म्यांना रक्तांजली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • युवकांनी आज क्रांतीदिनी SBI बँकजवळ इन्कम टॅक्स चौक गोरक्षण रोड अकोला येथे रक्तदान केले.
     

"आज आकाशात उडतांना आठवते,
शहिदांनीच स्वातंत्र्याची पंख दिले "

९ ऑगस्ट क्रांतीदिना निमित्ताने समाजसेवक निशिकांत बडगे मित्र परिवार व नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळा तर्फे आयोजित 
रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने युवकांनी आज क्रांतीदिनी SBI बँकजवळ इन्कम टॅक्स चौक गोरक्षण रोड अकोला येथे रक्तदान केले.

 

रक्तदान करुनी क्रांतीवीरांना रक्तांजली
वाहिली...
स्वातंत्र्याच्या वेदिवरती प्राण वेचले ज्यांनी,
प्रणाम तुम्हां वीरांनो दोन्ही करकमलांनी !

या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी अस्थिरोग तज्ञ  डॉ.अमोल रावनकार, कॉग्रेंस नेते अविनाश देशमुख आनंद उर्फ पिंटु वानखडे, निशिकांत बडगे, अंकुश अनिल गावंडे लाभले. यावेळी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कदम, रूपेश कांबळे, आषिश कसले, नरेंद्र चिमनकर, सोनु कावळे, नितीन राऊत, दिपक शर्मा, प्रशांत प्रधान, देवा भगत, अक्षय दलाल, अक्षय थोरात, निशांत जाधव, विपुल माने, कुलदीप अंधारे, आदींनी रक्तदान करून जिल्हा स्री रूग्णालयाच्या रक्तपेढीला दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News