वसई तालुक्याचा निकाल 82. 57 टक्के

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर
  • वसई तालुक्यातील 20 शाळांचा निकाल हा शंभर टक्के

वसई : माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. वसई तालुक्यातील गुणांच्या सरसरीत मुली सरस ठरल्या आहेत. यंदा वसई तालुक्याचा निकाल 82.57 टक्के इतका लागला. उत्तीर्ण झालेल्या मुलांमध्ये व कुटुंबियांत, मित्रमैत्रिणीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

तालुक्यात 259 शाळा असून 30 हजार 20 विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 948 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दहावीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर 12 हजार 449 मुले तर मुलींमध्ये 11,499 उत्तीर्ण झाल्या आहेत. गुणांची सरासरी पाहता मुलांना 75.32 तर मुलींना 85.23 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

वसई तालुक्यातील 20 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. नेटवर निकाल पाहण्यासाठी उत्सुकता दिसून आली. उत्तीर्ण झाल्याचे समजताच पालकांनी दुकानात जाऊन पेढे खरेदी केले व मुलांना भरवले. हा आनंद सर्व ठिकाणी पाहवयास मिळाला. विरार (7), वसई (8), नायगाव (3), नालासोपारा (2) या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News