पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर लाखभर विद्यार्थ्यांचं भविष्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने २४ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) यांचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवारी (ता. १९) जाहीर करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील पाचवीचे ४८८, तर आठवीच्या ४७२ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. 

यंदा या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीच्या पाच लाख १२ हजार ७६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख नऊ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी फक्त १६ हजार ५७९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.  

तसेच शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता आठवीमधून ३ लाख ५३ हजार ३६८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन लाख ४१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधून ६३ हजार २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १४ हजार ८१५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक म्हणून पात्र ठरले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News