वाणिज्य प्रमाणपत्र ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर
Saturday, 9 November 2019
पुणे, : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या ‘शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र’ ऑनलाइन परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. टंकलेखन परीक्षेत ४७,६४७ जण तर लघुलेखन परीक्षेत ५,७८८ जण उत्तीर्ण झाले. गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रतींसाठी प्रत्येकी १०० आणि ४०० रुपये शुल्क आकारले जाईल, असे तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.