लग्नात समाजसेवकांचा सन्मान

अॅड. मिलिंद सर्पे
Monday, 8 July 2019

किनवट: येथे रविवारी (ता. ७) कलावती गार्डन मध्ये पार पडलेल्या देठे-वासाटे लग्न सोहळ्यात समाजात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या एकूण ११ समाजसेवकांचा देठे व वासाटे परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.

किनवट: येथे रविवारी (ता. ७) कलावती गार्डन मध्ये पार पडलेल्या देठे-वासाटे लग्न सोहळ्यात समाजात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या एकूण ११ समाजसेवकांचा देठे व वासाटे परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.

एक सामाजिक जाणीव म्हणून हा उपक्रम घेण्यात आल्याचे सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी तथा नियोजित वधूचे पिता रामचंद्र देंठे यांनी सांगितले. शाल, पुष्पगुच्छ व  सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आलेले सन्मानार्थी असे आहेत: १. अभियंता प्रशांत ठमके (शैक्षणिक कार्य), अरूण आळणे (बुध्द धम्म प्रसार), साजिद बडगुजर (पत्रकारिता), अॅड.मिलिंद सर्पे (ग्रंथालय चळवळ), अभियंता भीमराव हाटकर (अँट्रासिटी), प्रकाश गायकवाड (सर्व धर्मीय विवाह मेळावा), दिगांबर भवरे (कृषी), श्रीरंग पाटील (उद्दोग), धर्माजी देठे (शिस्तपालन), देविदास मुनेश्वर (योगा), विश्वनाथ घुले (शिक्षण) आणि विठ्ठलराव भुरे (उद्दोग). सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. परशुराम गिमेकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News