मराठा आरक्षण हायकोर्टाकडून कायम, १२ ते १३ टक्के आरक्षण देणं शक्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

मुंबई: मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने आज (२७ जून) अंतिम निकाल दिला आहे. निकाल मराठा आरक्षण कायम राहील मात्र, १६ टक्के आरक्षण राहणार नाही. १२ ते १३ टक्के आरक्षण देणं शक्य असल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

तसेच राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले. न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. आरक्षणाच्या विरोधात चार तर समर्थनार्थ दोन याचिका दाखल झाल्या होत्या. 

राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटक म्हणून शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्यावर्षी घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. २६ मार्चला या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News