आरक्षण मिळालं आता, मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या दस्तावेजांची पडताळणी सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

अकोला  - नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुळ दस्तऐवजाच्या पडताळणीला शनिवार (ता. २९) पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) सुरुवात झाली. ही प्रक्रिया ४ जुलैपर्यंत चालणार आहे. 

अकोला  - नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुळ दस्तऐवजाच्या पडताळणीला शनिवार (ता. २९) पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) सुरुवात झाली. ही प्रक्रिया ४ जुलैपर्यंत चालणार आहे. 

इयत्ता बारावी आणि नीट परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज केले होते. हे अर्ज सादर करताना त्यांनी प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज आॅनलाइन अर्जासोबत सादर केले होते. जे विद्यार्थी नीट परीक्षेत १ ते ६० हजार आॅल इंडिया रँकिंगमध्ये आले होते त्यांच्या दस्तऐवजांची मुळ प्रत तपासण्यात येत आहे. ही प्रक्रिया शनिवार २९ जूनपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाली.

पहिल्याच दिवशी ४४० विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये एससी, एसटी, व्हीजे, एनटी-१, एनटी-२ आणि एनटी-३ यासह ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, इडब्ल्युएस आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यात येत आहे. गुरुवार ४ जुलै रोजी एससी, एसटी, व्हीजे, एनटी-१, एनटी-२ आणि एनटी-३ यासह ओबीसी, एसबीसी, एसईबीसी या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मुळ दस्तऐवज तपासण्यात येणार आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News