...नाहीतर सर्वांचेच आरक्षण रद्द करा - उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

सोलापूर : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात धनगर, लिंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकानं आरक्षण लागू करा, नाहीतर सर्वांचेच आरक्षण रद्द करा असं वक्तव्य केलं. उगाच, शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन सर्वधर्म समभावाची शिकवण देत बसू नका, असा टोमणा देखील त्यांनी यावेळी मारला. 
 
सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले,  आरक्षणामुळे एकूण लोकशाहीच संपत चाली आहे. त्यामुळे मुकाटयाने सगळ्यांचेच आरक्षण बंद करुन टाका. तसेच, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. लोकशाही नियंत्रणात ठेवायची असेल तर, "ईव्हीएम मशीण तोडा आणि माणसे जोडा", असे घणाघाती आव्हान त्यांनी केले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले.सगळीकडे दोन-अडीज लाखांचा फरक आहे . मी यापुर्वीही पराभव पचवलाय, त्यामुळे  फेरनिवडणूक व्हावी अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.  
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News