‘हाऊसफुल ४’ करिता अक्षय गाणार रॅप?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

बॉलीवूडमधला स्टंट परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षयकुमार. त्याने ‘सिंग इज किंग’, ‘स्पेशल २६’ आणि ‘इट्‌स इंटरटेन्मेंट’सारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. आता लवकरच तो त्याच्या ‘हाऊसफुल ४’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटासाठी एक रॅप साँग गाणार असल्याची चर्चा आहे

मुंबई :  बॉलीवूडमधला स्टंट परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षयकुमार. त्याने ‘सिंग इज किंग’, ‘स्पेशल २६’ आणि ‘इट्‌स इंटरटेन्मेंट’सारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. आता लवकरच तो त्याच्या ‘हाऊसफुल ४’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटासाठी एक रॅप साँग गाणार असल्याची चर्चा आहे.

तनिष्क बागची हे साँग कम्पोज करणार आहे. अक्कीसोबत हे रॅप साँग गायक मिका सिंहदेखील गाणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी ‘गलीबॉय’मध्ये अभिनेता रणवीर सिंगने रॅप साँग गायले होते आणि त्याला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता रणवीरपाठोपाठ अक्कीदेखील रॅप साँग गाणार का, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News