उत्कंठता निकाल

राणी मोरे
Wednesday, 27 February 2019

 "एंड द फर्स्ट प्राईज विनर इज" अनाउंसर सस्पेन्स वाढवत होती
"अँड द प्राईज गोज टू.. "उत्कृष्ट एकांकिका...आई फ्रॉम सि.के.टी कॉलेज नवी मुंबई"
मुलांनी एकच गलका केला. दिनरात केलेल्या मेहनतीच फळ मिळालं होतं.
उत्कृष्ट लेखन - अनिश देसाई, उत्कृष्टअभिनय- विकी मल्होत्रा, उत्कृष्ट नेपथ्य- बॉबी परेरा, उत्कृष्ट अभिनेत्री- रिता पटेल, सहअभिनेत्री-शिवानी सारंग आणि आता उत्कृष्ट एकांकिका.....

 "एंड द फर्स्ट प्राईज विनर इज" अनाउंसर सस्पेन्स वाढवत होती
"अँड द प्राईज गोज टू.. "उत्कृष्ट एकांकिका...आई फ्रॉम सि.के.टी कॉलेज नवी मुंबई"
मुलांनी एकच गलका केला. दिनरात केलेल्या मेहनतीच फळ मिळालं होतं.
उत्कृष्ट लेखन - अनिश देसाई, उत्कृष्टअभिनय- विकी मल्होत्रा, उत्कृष्ट नेपथ्य- बॉबी परेरा, उत्कृष्ट अभिनेत्री- रिता पटेल, सहअभिनेत्री-शिवानी सारंग आणि आता उत्कृष्ट एकांकिका.....
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस  समारंभ पार पडला आणि दमलेल्या विनर्स नि कॅन्टीनची वाट धरली."अण्णा, चीज सँडविचअँड कोक." बॉबीने कॉलेज कँटीनच्या खुर्चीत बसत जोरात ऑर्डर सोडली. "ये नाही हा बॉबी मला नकोय मी काहीही खाणार नाही." "अण्णा, ओन्ली कोक्स प्लिज" "कमॉन यार अन्या आता काय झालं तुला, का बक्षीसाच्या ट्रॉफीनी पोट भरलं तुझं". "तसं नाही रे पण...माझी आई आज.....". "आई.......ओ हो आईईई....आजही आई अनिश बाळासासाठी स्पेशल डिश बनवणार..आहे...हो ना अनिष बाळ तेव्हा तो काहीही न खाता लवकर घरी जणार....हो ना बाळा.... " निनादने तोंड वेगांडत अनिशची फिरकी घेतली.

"स्टुपीड...ममाज बॉय......" रितानेही बोलायची संधी सोडली नाही आणि त्यांचा अक्खा ग्रुप दात काढून फिदीफिदी हसला. अनिशला उगीच कानकोंड झालं पण आईसाठी एवढं सहन करायला हवं मी गेल्याशिवाय जेवत नाही काय काय नवीन डिश ट्राय करते माझ्यासाठी..माझ्या आवडीच्या आणि आज तर एकांकिका स्पर्धेचा निकाल फर्स्ट प्राईज मिळालंय आई ला फोटो पण सेंड केले तिच्याकडे बघून तर लिहिली एकांकिका आई" आईच्या आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळले आणि मित्रमैत्रिणीची चेष्टा त्याने फार मनावर घेतली नाही. ग्रुपनेही डीप मध्ये न जाण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो विषय तिथेच सोडून दिला. त्यानंतर प्रॅक्टिसच्या वेळी झालेल्या गमती, इतर स्पर्धक त्याचं काम, सोशल मिडियावरचे हॉट जोक, टीचर्स विषयी गॉसिप, कॉलेज मध्ये ऍडमिशन झालेल्या सुंदर, हॉट, सेक्सि न्यू कमर स्टूडन्ट, कोणाचे ब्रेकअप,पॅचअप ,त्यांचे विषय रेस च्या घोड्याप्रमाणे चौखूर उधळले होते. आणि आय एम नॉट ममाज बॉय हे सिद्ध करण्यासाठी त्या रेस मध्ये अनिश् ही वेगात दौडत होता.सँडविच कोक चा राउंड सम्पवून सर्व घरी जाण्यासाठी उठले.
तरुण रक्त फास्ट ड्रायविंगचा फिवर होताच ते सर्व बाईकस्वार जरासा आज यशाचं सेलिब्रेशन आणि जरासा फन म्हणून नेहमीचा रस्ता सोडून लॉंग रूट नि घरी निघाले.मुलीही कोणताही संकोच किंवा भीती न बाळगता बाणाच्या भात्यासारख्या पाठणीला चिकटल्या.

"तुझ्या आवडीची खीर केलीय आणि मस्त मलईकोफ्ता, मसालेभात." आईने अनिशला फोटो सेंड केले. "येताना जरा कोथींबीर आणशील का?" "फोटो बघून भूक दुप्पट झालीय पण यायला थोडासा उशीर होईल. " "ओके संभाळून ये" "चल रे अन्या बस लवकर तो सेल टाक आधी पॉकेट मध्ये" विकी ने बाईकला स्ट्रार्टर मारला. अन वाऱ्याशी स्पर्धा करत ती बेछूट तरुणाई हवेत तरंगत निघाली.अनिशला चिकटून बसलेल्या शिवानीचा स्पर्श....मोरपीस फिरवत होता. करूया का आता तिला प्रपोज ह्या स्वप्नात अनिश एवढ्यात खाताना मध्येच दाताखाली खडा यावा तसं झालं. त्यांना बाईकला ब्रेक लावावे लागले.एका चौकात खूप गर्दी झाली होती,ट्रॅफिक जॅम.. बहुतेक कोणाचा तरी अपघात झाला होता.

"बुलशीट..... कोण आलं भर उन्हात मरायला मध्येच." अनिश् बडबडला.
"काय माहीत यार, देख के नहीं चल सकते क्या." तेवढ्यात एक भाजीवाला त्यांच्या दिशेने धावत आला. "लेकरांनो जरा मदत करा कुणीतरी त्याना दवाख्यान्यात न्या रं, लय उपकार होतील, समद्यासनी सांगून दमलो सगळी तमाशा बगत्यात कुणी बी मदत करीना'तो हात जोडून गयावया करत होता. "आम्हीच भेटलो का तुला." "एकतर सगळ्या मूडचा सत्यानाश झाला." "ही मुंबई आहे इथे रोज शेकडो अक्सीडेंट होतात, तू काय ठेका घेतलाय का? ." "अवं..पण माणुसकी म्हणून तरी....." "जा तू तुझं काम कर असे खूप जण मरतात रोज त्यात अजून एक" सगळे त्याच्यावर तोंडसुख घेऊन आपापल्या घरी गेले.।

अनिशने बाईक पार्क केली.दोन दोन पायऱ्या पार करत ती जिना चढला. आईला सरप्राईज म्हणून त्याने स्वतःजवळच्या चावीने लॅच उघडले. दार उघडताच येणाऱ्या अन्नाच्या वासाने त्याची भूक खवळली. पण ते बनवणारी आई घरातच नव्हती,हॉल किचन बेडरूम बाथरूम सगळं चेक करून झालं.त्याने शेजारच्या काकूंना विचारलं.
"अरे कोथिंबीर आणायला गेलीय तुला आवडते ना मसालेभातावर भुरभुरलेली पण बराच वेळ झाला एव्हाना यायला हवी होती." त्याने आईला कॉल लावला.फोन आईने नाही,पोलिसांनी रिसिव्ह केला.कोथिंबीर आणायला गेलेल्या आईला ट्रकने उडवलं होतं. ती रस्तात तडफडत होती पण कोणीही तिला मदत केली नव्हती, पोलीस येऊन पंचनामा करून दवाख्यान्यात नेईपर्यन्त तिने ह्या जगाचा निरोप घेतला होता...
"असे खूप जण मरतात रोज त्यात आणखी एक ...... अनिशला स्वतःच वाक्य डोक्यात घाव घातल्यासारखं आठवत होतं. त्याच्या एकांकिका स्पर्धेतला निकाल उत्कृष्ट लागला होता पण रिंगणाच्या बाहेर न बघणारं यांत्रिकी कोरडं जगणं त्याच्या आयुष्यातल्या ममतेच्या निकाल लावून गेला होतं.......

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News