रिचा हरवली बालपणीच्या आठवणीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

रिचा चढ्ढाला हे वर्ष यशस्वी ठरणार आहे. कारण या वर्षी तिचे ‘कलम ३७५’ व ‘पंगा’ हे चित्रपट येणार आहेत.

‘फुकरे’ आणि ‘फुकरे २’मध्ये भोली पंजाबनची भूमिका साकारून स्टारडम प्राप्त झालेली रिचा चढ्ढाला हे वर्ष यशस्वी ठरणार आहे. कारण या वर्षी तिचे ‘कलम ३७५’ व ‘पंगा’ हे चित्रपट येणार आहेत.

नुकतीच तिने ‘कलम ३७५’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता ती ‘पंगा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. दिल्लीतील सरदार पटेल स्कूलमध्ये ‘पंगा’चे चित्रीकरण झाले. याच शाळेत रिचाने शिक्षण घेतले असल्यामुळे तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

रिचा सांगते, की ‘मी याच शाळेत शिकले. मी ज्या वर्गात शिकले त्या वर्गात गेले होते. तो वर्ग काहीसा बदललेला दिसला. मात्र बगीचा आहे तसाच आहे.’  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News