आठवते का 'ही' दिल्लीतली धक्कादायक घटना; एका वर्षानंतर काय आहे तिथली परिस्थिती

सुरज पाटील
Tuesday, 9 July 2019

एका वर्षापूर्वी म्हणजे 30 जुन 2018 रोजी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली होती, ज्यामुळे फक्त दिल्लीच नाही तर संपुर्ण देश हादरला होता. एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तब्बल 11 जणांनी सामुहिक आत्महत्या केली होती. काय आहे सध्या त्या घटनेची सत्यता आणि कोण राहाते सध्या त्या ठिकाणी जाणुन घ्या.

एका वर्षापूर्वी म्हणजे 30 जुन 2018 रोजी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली होती, ज्यामुळे फक्त दिल्लीच नाही तर संपुर्ण देश हादरला होता. एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तब्बल 11 जणांनी सामुहिक आत्महत्या केली होती. काय आहे सध्या त्या घटनेची सत्यता आणि कोण राहाते सध्या त्या ठिकाणी जाणुन घ्या.

दिल्ली बुराडी या ठिकाणी असलेल्या संत नगर परिसरात घर क्रमांक 137/5 मध्ये राहणाऱ्या भाटिका कुटुंबातील 11 सदस्यांनी 30 जून 2018 रोजी सामुहिक आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी घराचा दरवाजा न उघडल्याने एका शेजाऱ्याने त्या घरात प्रवेश केल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

काय आहे सध्याची परिस्थिती...
ज्या घरामध्ये या भाटिका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली होती, त्या घर क्रमांक 137/5 येथे सध्या दोन भाऊ राहातात. रात्रीच्या वेळी कोणतेही शेजारी घराच्या आजूबाजूला फिरकत नाहीत. भाटियांचे घर म्हणजे आता भुताचा वाडा असल्याचेही तिथल्या काही शेजाऱ्यांचे मत आहे, म्हणून काही शेजाऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतीदेखील उंच करून घेतल्या आहेत, जेणेकरून भाटिया कुटुंबियांच्या घराचा कोणताच भाग त्यांच्या नजरेस येणार नाही.

काय होतं प्रकरण...
1 जुलै 2018 रोजी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आपला शोध सुरू केला. शोध मोहिम सुरू असताना पोलिसांना काहीप्रमाणात काही डायरी, लोखंडी तार, स्टुल आणि इतर साहित्यदेखील सापडले. घराशेजारी असलेल्या एका सीसीटीव्हीच्या माध्यामातून या आत्महत्येची तयारी काही दिवसांपासून करत असल्याचेही उघड झाले होते. तर डायरीमधून मिळालेल्या माहितीवरून असं स्पष्ट झाले की या कुटुंबाचा तंत्रविद्देवर मोठा विश्वास होता, तर 'मोक्ष प्राप्ती'साठी त्यांनी आत्महत्या केल्याचे यावरून स्पष्ट झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News